सुखाचा शोध
सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का? कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार …